*रंगखडूंचे तुकडे!*
एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, *"we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same!"*
म्हणजे, *"आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे!"*
किती सुंदर वाक्य आहे नाही! *आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलो असतो.* पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जे चांगुलपण आहे ते का नष्ट होऊ द्यायचं? *ज्या क्षमता आहेत त्या का लयास जाऊ द्यायच्या?* रंगाचे खडू कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! *तो तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो*... अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी *शिकलंच पाहिजे!!*