सोप्प नसतं

 सोप्प नसत  हो

सोप्प नसत हो,
डोळ्यात तळ साचल असताना
मनमोकळ  हसायला,
अलगद पाठ  फिरवून ढसाढसा  रडायला.
सोप्प  नसत हो,
मानातल  सांगायला, 
ऐकणाऱ्याला त्याची जाणिव  नाही
तरीही मनमोकळ   बोलायला.
सोप्प  नसत हो, 
आपल्या  व्यक्तिला आपल्यापासून दूर करायला
आपलच  ह्रदय काळजाबाहेर काढून  ठेवायाला.
सोप्प नसत हो
पुन्हा विश्वास करायला
लपलेल्या चंद्राला उन्हात शोधायला.

😃कुसुम 🌼


Popular posts from this blog

आराधना 2k20

मरण किती स्वस्त झालं आहे!